पुण्यातील फॅशन शोमध्ये रॅम्पवर अवतरल्या गरोदर महिला
आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. गरोदरपणात त्यांचं मोठं कोड कौतुक केलं जातं. पुण्यात मात्र गर्भवतींच्या कोड-कौतुकाचा एक अनोखा कार्यक्रम मोठ्या हौशीने पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बेबी बम्प फॅशन शो', असे या फॅशन शोचे नाव होते. गर्भवती महिलांचा उत्साह वाढावा, त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, यासाठी हा आगळा-वेगळा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.
गरोदरपणात डोहाळेजेवण, चोरचोळी, वनभोजन, चांदण्यातलं भोजन अशा एक ना अनेक पद्धतीने गर्भवती महिलांची हौस पुरवली जाते. परंतु आता त्यामध्ये फॅशन शोचीही भर पडली आहे.
या फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या आनेक महिलांनी सांगितले की, रॅम्पवॉक करणे हे त्यांचे लहाणपणापासूनचे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले
अनेक गर्भवती महिलांनी मोठ्या हौसेने या फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये वर्कींग वूमनचे प्रमाण जास्त होते. ऑफिस, गरोदरपणा, घरातील कामे हे सर्व सांभाळून त्यांनी या फॅशन शोसाठी तयारी केली होती.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजिका आणि एस. एल. फाऊंडेशनच्या प्रमुख आरजे निसर्ग या स्वतः 7 महिन्यांच्या गर्भवती आहेत.
पुण्यातल्या रॉयल हेरिटेज या मॉलमधील रॅम्पवर चालणाऱ्या या मॉडेल्स असामान्य आहेत. यापैकी कुणी महिला 7 महिन्यांची गर्भवती आहे, कुणी 8 महिन्यांची तर कुणी 9 महिन्यांची गर्भवती मॉडेल आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -