Anushka Sharma | अनुष्काचं वर्कआउट रुटीन; गरोदरपणातही फिट अन् मेन्टेन

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 31 डिसेंबर रोजी डिनर करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विराट कोहलीने कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या बाळाच्या जन्मापूर्वी विराट आणि अनुष्काने कोरोना टेस्टही करुन घेतली आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यातही आपलं वर्कआउट सुरुच ठेवलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ट्रेडमीलवर वॉकिंग करताना दिसत आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.
अनुष्का शर्माची डिलीवरी डेट याच महिन्यात आहे. अशातच ती आधीपेक्षा जास्त आपली काळजी घेताना दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक व्हिडीओ पोस्ट करत अनुष्काने आपल्या गरोदरपणाबाबत माहिती दिली होती.
या व्हिडीओमध्ये ती एक ट्रेडमिलवर चालताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने क्युट असं संबोधलं आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, क्यूटी... अशाप्रकराच्या स्टफसाठी मला सपोर्ट करा. अनुष्काच्या या वर्कआउट व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
अनुष्का शर्मा गरोदर असून जानेवारीत तिची डिलीवरी डेट आहे. परंतु, अनुष्काने गरोदरपणातही आपली फिगर आणि वजन मेंटेन केलं आहे. अनुष्का बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली, पण तिच्या फिगरवर मात्र फारसा फरक पडलेला दिसला नाही. याचं कारण म्हणजे, अनुष्काचं वर्कआउट रुटीन. अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येते.
(Image Credit : @anushkasharma/Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -