कपिल 1, सलमान खान 4, माधुरी 5, मग दुसऱ्या नंबरवर कोण?
'ऑरमॅक्स इंडिया' या कंपनीने मे 2016 मध्ये हा सर्व्हे केला आहे. या कंपनीद्वारे प्रत्येक महिन्याला असा सर्व्हे केला जातो. देशभरातील 14 शहरांमधील विविध लोकांशी मतं जाणून हा निष्कर्ष काढण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका सर्व्हेनुसार टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी कपिल शर्माला पसंती दिली आहे. प्रेक्षकांनी 'बिग बॉस' या रिअलिटी शोचा अँकर सलमान खानपेक्षा कपिलच लोकप्रिय असल्याची पावती दिली आहे.
. इतकंच नाही तर गुत्थी म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता सुनील ग्रोव्हरही सलमानच्या पुढे आहे.
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सलमान खान चौथ्या क्रमांकावर आहे.
या यादीत 'स्प्लिट्सविला'चा चार्मिंग आणि हँडसम अँकर रणविजय तिसऱ्या स्थानावर आहे.
तर माधुरी दीक्षित पाचव्या क्रमांकावर आहे.
कॉमेडीच्या किंगने बॉलिवूडच्या सुलतानला धोबीपछाड दिली आहे. कारण कॉमेडी किंग कपिल शर्मा सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेता ठरला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -