Gandhi@150 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉलिवूड अवतरलं
शाहरुख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमिर खान यांच्यासोबत घेतलाला सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदींनी दांडीमध्ये बनलेलं महात्मा गांधींचं संग्रहालय, स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याची विनंतीही सर्वांना केली.
महात्मा गांधींच्या विचारांना सिनेमांच्या माध्यमातून जगभरात प्रसारित करा असं आवाहन मोदींनी यावेळी कलाकारांना केलं.
मोदींसोबत झालेल्या खास भेटीमध्ये एकता कपूर आणि कंगाना राणावत दोघी फार उत्साही दिसत होत्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. (Photo Credit: @narendramodi Instagram)
यावेळी शाहरुख खान, आमिर खान कंगना राणावत, सोनम कपूर, जॅकी श्रॉफ, राजकुमार हिराणी, जॅकलिन फर्नांडिस, कपिल शर्मा, एकता कपूर, इम्तियाज अली, बोनी कपूर इत्यादी कलाकार मंडळी उपस्थित होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेते जॅकी श्रॉफ
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -