PHOTO : सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवर खेळण्यास खेळाडू उत्सुक, कसं आहे स्टेडिअम?

हार्दिक पांड्या म्हणाला की, जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांसमोर खेळण्यास आतूर आहे. सर्व खेळाडूंना ते खूप आवडले. स्टेडियम समजण्यास आम्हाला एक तास लागला. मला अभिमान आहे की हे स्टेडियम भारतात आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे मला आभार मानायचे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे.
यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे.
चेतेश्वर पुजारा म्हणाला की, हे एक खूप मोठे स्टेडियम आहे. पहिला सामना खेळण्यास मी उत्सुक आहे.
एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या क्षमतेच्या मोटेरा स्टेडियमवर येत्या 24 फेब्रुवारीला पहिला डे-नाईट कसोटी आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
जगभरातील मैदानांमध्ये खेळलेले भारतीय खेळाडू जगातील सर्वात मोठे मोटेरा स्टेडियम पाहून चकित झाले. येथील सुविधा समजण्यास त्यांना एक तास लागला. या स्टेडियमचे ड्रेसिंग रूम जिमशी जोडलेले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -