ऑस्ट्रेलियाची टेस्ट 'टीम ऑफ द ईयर'
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा आपल्या 'टीम ऑफ द ईयर'मध्ये समावेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडचा जोस बटलर, दक्षिण आफ्रिकेचा जेसन होल्डर, कगिसो रबाडा, पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास यांचाही या संघाच समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचा कुशल मेंडिस, न्यूझीलंडचा टॉम लाथन यांना सलामीवीर म्हणून निवडण्यात आलं आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिविलिअर्सलाही या संघाच स्थान देण्यात आलं आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन या संघाचा कर्णधार घोषित करण्यात आलं आहे. तर इंग्लंडचा जोस बटलर या संघाचा विकेटकीपर असणार आहे.
विशेष म्हणजे या ऑस्ट्रेलियन संघात ऑस्ट्रेलियाच्या एकाच खेळाडूचा समावेश आहे. केवळ नाथन लायनला या संघात स्थान मिळालं आहे. लायन आणि भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकाचे दोन-दोन, श्रीलंका, इंग्लंड, वेस्टइंडिज आणि पाकिस्तानच्या एक-एक खेळाडूचा समावेश या संघात करण्यात आला आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. मात्र विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने त्याआधीच इतिहास रचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -