Photo | शिवकालीन नाण्यांचा संग्रह करणारा 'शिवप्रेमी', मुंबईतलं छोटेखानी संग्रहालय
अकबराची चांदीची नाणी, अकबर दाम औरंगजेब, शहाआलम (एक आणि दोन), शहाजान, ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी, राणी एलिझाबेथ, यादव कालीन, मोहम्मद तुघलक, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रत्येक राज्यात काही विशिष्ट वापरली जाणारी नाणी जाधव यांच्याकडे आहेत. तसेच सातवाहन काळातीलही नाणी त्यांच्याकडे आहेत.
शेकडो वर्षांपूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा असल्यानं त्यांचे जतन करणही फार महत्वाचे आणि जोखमीचे आहे. या नाण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक नाण्यांना होल्डर्समध्ये ठेवावी लागतात. काही नाण्यांना गंज लागू नये म्हणून त्यांना खोबरेल तेलात ठेवावे लागते, तर काही नाणी व्हॅसलिन लावून ठेवावी लागतात.
राजा जाधव यांच्याकडे विविध प्रकारची नाणी असली तरी 'शिवराई' नाणी ही त्यांच्यासाठी खास आहेत.
1982-83 दरम्यान गंगोत्रीला गेलेले असताना एका ठिकाणी त्यांना विविध भाषेची नाणी विकायला ठेवलेली दिसली. त्याबाबत विचारणा केली असता ती नाणी ही शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी त्यांचे लक्ष काही देवनागरी शब्द असलेल्या नाण्यांवर गेले तेव्हा ती शिवकालीन नाणी असल्याचे त्यांना समजले आणि ती सर्व नाणी त्यांनी विकत घेतली.
राजा जाधव यांनी आपल्या आजवर 15 हजारांहून अधिक ऐतिहासिक नाण्यांचा 'नाणीसंग्रह' तयार झाला आहे. या नाण्यांतील विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे शिवकालीन 'शिवराई' ही नाणी आहेत.
राजा जाधव यांना महाराष्ट्र सरकारनं साल 1997 मध्ये 'समाज भूषण' या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.
हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न साकारलं जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलनही सोळाव्या शतकात अमलात आणले. या नाण्यांची ओढ आणि आकर्षण तमाम शिवप्रेमींमध्ये असते. मात्र ही नाणी जमवण्याची आवड नालासोपाऱ्यातील राजा जाधव यांनी जोपासली आहे.