ईशा अंबानीच्या इटलीमधील साखरपुड्याचे फोटो
सोनम कपूर आणि आनंद आहुजाही या ग्रॅण्ड सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री प्रियांका चोप्राने निक जोनाससह फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासह हजेरी लावली
अंबानी कुटुंबाची जवळची मैत्रीण म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री जुही चावला ही देखील या ग्रॅण्ड पार्टीत हजर होते. जुहीने या सोहळ्यातील तिचा फोटोही शेअर केला आहे.
तर जान्हवी कपूरने ब्लॅक कॉकटेल गाऊनमध्ये ईशा अंबानीच्या पार्टीची शान वाढवली.
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल साखरपुड्याला एखाद्या रॉयल कपलप्रमाणे दिसत होते.
यावेळी ईशाने वडील मुकेश अंबानी यांच्यासह एन्गेजमेंट व्हेन्यूवर एन्ट्री केली.
याच वर्षी आनंद पिरामलने ईशा अंबानीला महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये प्रपोज केलं होतं. मे महिन्यात एका खासगी सोहळ्यात दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत एक कार्यक्रमही पार पडला होता. या वर्षी डिसेंबर महिन्यात ईशा आणि आनंद लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.
लेक कोमोमधील लक्झरी व्हिलाच्या बाल्कनीमध्ये वडील मुकेश अंबानींसह ईशा अंबानी.
डिनर, डान्स आणि लाईव्ह परफॉर्मन्सशिवाय साखरपुडा सोहळ्यात नीता अंबानींपासून आनंद पिरामल यांची भाषणांनी या कार्यक्रमात रंगत आणली.
तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ड्यूमो डी कोमो आणि टीट्रो सोसाले कॉमोमध्ये पाहुण्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे.
21 सप्टेंबरपासून इटलीच्या लेक कोमोच्या निसर्गरम्य परिसरात भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या साखरपुडा सोहळा सुरु आहे. या ड्रीम डेस्टिनेशन एन्गेजमेंट पार्टीचा आज तिसरा दिवस आहे. या भव्य सोहळ्यात बॉलिवूड आणि अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थित होते.
अभिनेते अनिल कपूर यांनीही ईशा-आनंदच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -