PHOTO : वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका
महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांपर्यंत मदत कार्य पोहचवण्यासाठी एअर फोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्सनी आधी परिसराची आणि पाण्याची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवळपास 17 तासांच्या खोळंब्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या जवळपास 700 प्रवाशांची एनडीआरएफ आणि नेव्हीच्या टीमने सुटका केली.
एनडीआरएफसोबत नेव्हीची टीमही घटनास्थळी दाखल झाली होती.
मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
त्यानंतर एनडीआरएफ, वायू दल आणि नेव्हीच्या टीमने बचावकार्य सुरु केलं.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने प्रवाशांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु केलं.
पाण्यातील गाडी पुढे नेणे शक्य नसल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ रखडली होती.
उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे रुळावर दोन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं.
कोल्हापूर निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून बदलापूर जवळील वांगणीजवळ अडकली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -