PHOTO : पुतण्या अब्दुल्लाह खानच्या निधनानंतर सलमान खानची भावुक पोस्ट
आधी असं सांगण्यात येत होतं की, अब्दुल्लाहचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. परंतु, कुटुंबियांनी हे वृत्त फेटाळलं आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअब्दुल्लाह खान आधी इंदौर येथे राहत होता. परंतु, 10 वर्षांआधी तो मुंबईमध्ये शिफ्ट झाला होता. त्यानंतर तो सलमान खानच्या 'बिइंग ह्युमन' फाऊंडेशनसोबत काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तो स्वतःच अंधेरी येथील धीरूभाई कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात दाखल झाला होता. परंतु, जेव्हा सलमान खानला याबाबत समजलं तेव्हा त्याने अब्दुल्लाहला बांद्रा येथील लिलावती रूग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते.
अब्दुल्लाह खानला बॉडी बिल्डिंगची हौस होती. त्याची शरीरही सुडौल होतं. पण अब्दुल्लाहला मधुमेहाने ग्रासले होते.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नात्याने अब्दुल्लाहचा काका आहे. अब्दुल्लाह हा सलमानच्या आतेभावाचा मुलगा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास 10 वर्षांपूर्वी अब्दुल्लाह मुंबईमध्ये शिफ्ट झाला होता.
स्वतः सलमान खानने अब्दुल्लाहचा फोटो शेअर करत, 'तू कायम आठवणीत राहशील' असं लिहिलं आहे.
सलमान खानचा पुतण्या अब्दुल्लाह खान यांचं मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री निधन झालं आहे. तो 38 वर्षांचा होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -