पद्मचे मानकरी असलेले रिअल हिरो
मीनाक्षी अम्मा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 68 वर्षांपासून मीनाक्षी अम्मा यांनी कलारिपटट्टूच्या प्रचार आणि प्रसाराचा वसाच घेतला आहे.
वयाच्या सातव्या वर्षापासून मीनाक्षी अम्मा यांनी वडिलांकडून हा साहसी खेळ शिकायला सुरुवात केली.
76 वर्षांच्या मीनाक्षी अम्मा तलवारबाजी, लाठीकाठी आणि उंचीझिल शिकवतात.
कलारिपयट्टू ही साहसी कला शिकवणाऱ्या मीनाक्षी अम्मा या एकमेव महिला आहेत.
पद्म पुरस्कारांनाही जितेंद्र हरपाल यांनी आपल्या गायकीची दखल घ्यायला भाग पाडलं.
पण तरीही त्यांच्या सुरांना ओडिशासह संपूर्ण देशानं आपलं मानलं. जितेंद्र हरपाल यांना उदिशात मोठा फॅन फॉलोइंग आहे.
दलित कुटुंबात जन्म झालेल्या हरपाल यांनी गाण्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही.
मूळचे उदिशाचे असलेल्या जितेंद्र हरपाल यांना रंगबाती या गाण्यानं नावलौकिक मिळवून दिला.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो महिलांची प्रसुती त्यांनी केली. 91 वर्षाच्या डॉ. भक्ती आजही त्याच ऊर्जेने आणि जोमाने रुग्णांची मोफत सेवा करतात.
रकारी नोकरी सोडून मोफत उपचार देण्याचा ध्यास डॉ. भक्ती यादव यांनी घेतला.
इंदोर मधील पहिली महिला डॉक्टर ही डॉ. भक्ती यादव यांची प्रमुख ओळख.
गिरीष भारद्वाज
ब्रिज मॅन असलेले गिरीष भारद्वाज देशाचे रिअल हिरो मानले जातात.
त्यांनी बांधलेल्या सस्पेन्शन पूलनं अनेकांना विकासाचा मार्ग दाखवला.
लोकसहभागातून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील अतिशय दुर्गम ठिकाणी 100 हून अधिक पूल गिरीष भारद्वाज यांनी उभारले.
ब्रिज मॅन ओळख असलेले गिरीष भारद्वाज पेशाने इंजिनिअर आहेत. नोकरी न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा ब्रिज बांधण्याकडे वळवला.
यंदा पद्म पुरस्कारांच्या यादीत भारतीयांसाठी रिअल हिरो असणारी अनेक नावं झळकली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -