18 वर्षांचा संसार मोडला, अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट
अरबाज आणि मलायका या दोघांनीही काही दिवसांपूर्वीच कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्याला आज कोर्टाची मंजुरी मिळाली. कोर्टाच्या मंजुरीनंतर दोघांचं 18 वर्षांचं नात संपलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरबाज आणि मलायका अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र आल्याची चर्चा होती. मात्र घटस्फोटानंतर दोघांचं नातं संपल्याचं स्पष्ट झालं.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा-खान यांच्या नात्याविषयी चाललेल्या अनेक दिवसांपासूनच्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला. मुंबईच्या वांद्रे येथील कोर्टात दोघांनीही घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केलं.
काही महिन्यांपूर्वीही अरबाज आणि मलायका मुलगा अरहानच्या बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र दिसले होते.
10 मे रोजी जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठीही अरबाज आणि मलायका एकत्र दिसले होते.
मुलगा अरहानचा ताबा मलायकाला दिल्याची माहिती आहे. तर अरबाजला पाहिजे तेव्हा मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -