पुण्यातला सामना सोडून नीता अंबानी साईंच्या चरणी
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डऐवजी जेपी ड्युमिनीला संधी दिली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसततच्या पराभवाच्या मालिकेनंतर मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला आहे.
त्याआधी, सुरेश रैनाने नाबाद 75 आणि अंबाती रायुडूने 46 धावांची खेळी करून चेन्नईला पाच बाद 169 धावांची मजल मारुन दिली होती.
सूर्यकुमार यादवने 44 आणि एविन लुईसने 47 धावांची खेळी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला.
कर्णधार रोहित शर्माने सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी उभारून मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
मुंबई इंडियन्सने दोन चेंडू आणि आठ विकेट्स राखून ते पार केलं.
पुण्याच्या एमसीए स्टेडियमवरच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं.
मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांमधला केवळ दुसरा विजय ठरला.
रोहित शर्माच्या कर्णधारास साजेशा खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला.
आपण फक्त मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करायला आलो होतो, असं नीता अंबानींनी सांगितलं.
पुण्यात सामना चालू असताना नीता अंबानी शिर्डीत होत्या.
नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या जर्सीत शिर्डीत दाखल झाल्या आणि त्यांनी सायंकाळच्या धुपारतीला उपस्थिती लावली.
मुंबई इंडियन्सला गेल्या सहा सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळवता आला आहे. त्यामुळे नीता अंबानी यांनी साईंना विजयासाठी साकडं घातलं.
मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी संघाच्या मालकीन नीता अंबानी शिर्डीला जाऊन साईंच्या चरणी लीन झाल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -