नव्या नोटांमध्ये नेमका फरक तरी काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन हजाराची नोट
परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.
रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील 72 तास म्हणजे 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील.
ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील.
पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील.
एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.
देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील.
मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.
9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले.
50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील.
10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील.
काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -