वाळे, पैंजण, कंबरपट्टा; मुंबईच्या डबेवाल्यांकडून ब्रिटनच्या राजपुत्राला प्रेमाची भेट
मुंबईचे डबेवाले आणि ब्रिटनचं राजघराणं याचं नातं सगळ्यानांच परिचीत आहे. प्रिन्स चार्ल्स नुकतेच पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्केल यांना मुलगा झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांनी आपल्या मुलाचं नाव 'आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर' असं ठेवलं आहे. हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात.
प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना 6 मे रोजी मुलगा झाला. स्थानिक वेळेनुसार 6 मे रोजी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. नुकतीच त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं आठवं पतवंड ठरलं आहे.
डबेवाले हे सर्व दागिने आज ब्रिटीश काऊन्सिलमध्ये जाऊन देणार आहे. त्यांच्यामार्फत दागिने ब्रिटन राजघराणाच्य नव्या राजपुत्राला मिळतील.
प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीमुळे आम्हाला जगभरात ओळख मिळवून दिली. आम्हाला, आमच्या कामाला प्रसिद्धीच्या झोतात आणणारे प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले आणि राजघराण्याला राजपुत्र मिळाला. याचा आम्हाला आनंद झाला आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपल्या नातवाला भेट देतात तसंच आमच्या या छोट्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही ही भेट पाठवत असल्याचं डबेवाल्यांनी सांगितलं.
याचा आनंद मुंबईच्या डबेवाल्यांनाही झाला आहे. त्यामुळेच प्रिन्स चार्ल्स यांच्या नातवासाठी डबेवाल्यांनी दागिन्यांची खरेदी केली आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांनी आज घाटकोपरच्या सेजल ज्वेलर्स या दुकानातून दागिने विकत घेतले. या दागिन्यांमध्ये चांदीचे वाळे, पैंजण, कंबरपट्टा, चैन तसंच सोन्याचं हनुमानाचं पेंडटही घेतलं आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या तिसऱ्या पिढीशी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी ही खरेदी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -