विधानपरिषद निवडणूक निकाल 2018 : संपूर्ण निकाल
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 550 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे 462 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.
नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. कारण सेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास 200 मतांनी विजय मिळवला.
अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -