कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
आयकर भरणारे आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी कर्जमाफीला पात्र नाहीत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हॅटला पात्र आणि व्यापारी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही
भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार कर्जमाफीसाठी एका महिन्याचा पगार देणार
नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजारांपर्यंत अनुदान मिळणार
40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी कर्जमाफी
30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
एकूण कर्जमाफीसाठी सरकारच्या तिजोरीवर 34 हजार कोटी रुपयांचा बोजा
राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी
राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -