Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
दोन घुसखोरांना ठार करुन सर्जिकल स्ट्राईकमधील जवान संदीप सिंह शहीद
संदीप सिंह हे भारताने 2016 मध्ये पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी होते. त्यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहीद होण्यापूर्वी संदीप सिंह यांनी दोन घुसखोरांना ठार केलं होतं. मात्र दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत संदीप सिंह यांनाही बलिदान द्यावं लागल्याने, सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. उरी हल्ल्याच्या दहा दिवसानंतर भारतीय लष्करानं 28-29 सप्टेंबर 2016 रोजी सीमेपार जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करुन सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यात जवळजवळ 50हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. पण सर्जिकल स्ट्राईक करणं आणि पुन्हा सुरक्षित माघारी परतणं हे लष्कराच्या जवानांसाठी वाटतं तेवढं सोपं नव्हतं.
संदीप सिंह हे तमाम जवानांसाठी हिरो होते. ते 4 पारा (स्पेशल फोर्स) युनिटचे सदस्य होते.
पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी असलेला भारताचा जवान शहीद झाला आहे. तंगधार सेक्टरमधील चकमकीदरम्यान लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण आलं. संदीप सिंह हे जम्मू काश्मीरमधील तंगधार परिसरातील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी तैनात केलेल्या तुकडीत होते. त्यावेळी घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत सोमवारी त्यांना वीरमरण आलं.
संदीप सिंह हे एलओसीवर दहशतवाद्यांशी दोन हात करत होते. त्यावेळी त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -