Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमानुषपणाचा कळस... पाळणाघरात चिमुकलीला मारहाण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘या सर्व प्रकरणावर माझी मागणी आहे की, माझ्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या या महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसंच जेव्हा माझ्या मुलीला मारहाण होत असताना इतर मुलं इतके गाढ कसे काय झोपले होते? त्या मुलांसोबत देखील असंच काही झालं होतं का?’ अशी माहिती या चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझा दिली आहे.
जखमी चिमुकलीला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाळणाघरात चिमुकलीला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाविषयी बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला. ‘हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती. याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथं नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे.’ अशी प्रतिक्रिया याप्रकरणी पंकजा मुंडेंनी दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी खारघर पोलिसात आया अफसाना शेख आणि पाळणा घराची मालकीण प्रियंका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकारानं पालकांमध्ये भीती पसरली आहे.
जखमी चिमुकलीला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आज दुपारी पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे.
खारघर सेक्टर १० मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणा घरात आहेत.
अतिशय निर्दयीपणे चिमकुलीला मारहाण करण्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना पाळणाघरात ठेवत असाल तर शंभरवेळा विचार करा. कारण नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -