KBC9 : 'मन की बात'मुळे या महिलेने 50 लाख रुपये जिंकले
50 लाख जिंकल्यानंतर 15 व्या प्रश्नासाठी एकही लाईफ लाईन शिल्लक नसल्याने मिनाक्षी यांनी स्पर्धेतून माघार घेतली. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘भारत छोडो’चा नारा कोणी दिला होता, असा प्रश्न मिनाक्षी यांना विचारण्यात आला होता. युसूफ मेहर अली यांनी हा नारा दिला होता, असं अचूक उत्तर मिनाक्षी यांनी दिलं.
मिनाक्षी यांना 50 लाख रुपयांसाठीचा 14 वा प्रश्न ‘भारत छोडो’ चळवळीविषयीचा होता. या प्रश्नाचं उत्तर मिनाक्षी यांनी लगेचच दिलं. पंतप्रधान मोदींनी या प्रश्नाचा उल्लेख ‘मन की बात’मध्ये केला होता, ते ऐकलेलं अजून लक्षात आहे, असं मिनाक्षी यांनी सांगितलं.
50 लाख रुपये जिंकणाऱ्या मिनाक्षी जैन यांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंत झालेलं आहे. या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चं योगदान असल्याचंही मिनाक्षी यांनी सांगितलं.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झालेल्या मुंबईतील मिनाक्षी जैन यांनी 50 लाख रुपये जिंकले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -