अँड्र्यू टाय 10 लाख, विल्यमसन 10 लाख, ऋषभ पंत.....
स्टाईलिश प्लेयर अॅवॉर्ड विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर सोबत स्टाईलिश प्लेयर अॅवॉर्डचाही किताब मिळवला. त्याला या पुरस्कारासाठीही 10 लाख रुपये तर दोन्ही पुरस्काराचे मिळून 20 लाख रुपये मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेस्ट ग्राऊंड अॅवॉर्ड - सर्वोत्तम मैदान अर्थात बेस्ट ग्राऊंडचा पुरस्कार पंजाब क्रिकेट असोसिएशनला मिळाला. या मैदानावर केवळ 7 सामनेच खेळवण्यात आले होते. तरीही या मैदानाने बाजी मारली. पंजाब क्रिकेट असोसिएशनने 25 लाख रुपयाचं इनाम पटकावलं.
बेस्ट IPL ग्राऊंड ऑफ द सीझन कोलकात्याच्या ईडन गार्डनला बेस्ट IPL ग्राऊंड ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला. त्यांना 50 लाख रुपय देऊन गौरवण्यात आलं.
फेयर प्ले अॅवॉर्ड- रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फेयर प्ले अॅवॉर्ड मिळाला. त्यांना चषक देऊन गौरवण्यात आलं.
नयी सोच सीजन अॅवॉर्ड- आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला नयी सोच सीजन अॅवॉर्ड मिळाला.
सर्वोत्तम झेल- दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळलेल्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्डला परफेक्ट कॅच ऑफ द सीजन अर्थात सर्वोत्तम झेलचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम झेलसाठी त्याला 10 लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं.
मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर - कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नारायण यंदाचा मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर अर्थात सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला. त्यालाही 10 लाखाचं बक्षीस मिळालं.
पर्पल कॅप - किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू टायने सर्वोत्तम गोलंदाजाचा किताब पटकावला. टायने सर्वाधिक 24 विकेट्स घेत पर्पल कॅपचा मान मिळवला. टायला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं.
ऑरेंज कॅप - सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसने यंदा उत्तम कर्णधाराची भूमिका तर बजावलीच, शिवाय तो यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. 735 धावांसह ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या विल्यमसनने 10 लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं.
इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर- दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत यंदाचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर अर्थात उदयन्मुख खेळाडू ठरला. त्याला 10 लाख रुपयांचं इनाम मिळालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -