आर्मीचा जमिनीवर, नेव्हीचा पाण्यात, एअरफोर्सचा हवेत तर ITBP चा बर्फात योगा
हवेतच नाही तर पाण्यातही योगाची प्रात्यक्षिकं करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिन. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज देशभरात योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये योगासनं केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योग प्रात्यक्षिक दाखवली.
नौदलाच्या जवानांनी जपानच्या नौदलासोबत योगा केला. आयएनएस सह्याद्रीवर नौदलाच्या जवानांनी योगा केला.
इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी चक्का बर्फात योगा केला. आयटीबीपीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन फोटो शेअर केले आहेत.
हिमवीर 17 हजार फुटांवर योगा सादर करत आहेत, असं आयटीबीपीने म्हटलं आहे.
बर्फात योगाची प्रात्यक्षिकं
हिमालयात योगा
हवेत केलेला वायू नमस्कार
भारतीय हवाई दलाच्या जवानांनी थेट आकाशात योगा केला. जवानांनी 15 हजार फुटांवरुन उत्तम आरोग्याचा संदेश दिला.
जवानांनी विविध आसनं केली. हवेत केलेलं वायू पद्मासन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -