भारतीय बनावटीचं 'तेजस' विरुद्ध पाकिस्तानचं 'JF-17 थंडर'
तेजसने 3 हजारांपेक्षा जास्त उड्डाण घेतले आहेत. मात्र सध्या हे विमान भारतीय अरोनेटीक्स ऑपरेशनल क्लियरन्समध्ये समाविष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजसला अजून भारतीय वायूसेनेत दाखल करण्यात आलेलं नाही. भारतीय अॅरोनेटीक्स लिमीटेड आणि डीआरडीओ यांनी विमान कंपनीसोबत मिळून तेजसची 1984 मध्ये निर्मीती केली होती.
पहिल्यांदाच भारतीय विमान एखाद्या परदेशी शोमध्ये भाग घेत आहे. तेजसची तुलना पाकिस्तानच्या 'JF-17 थंडर' या लढाऊ विमानाशी केली जाते.
तेजस विरुद्ध 'JF-17 थंडर'- विमान तज्ञ अंगद सिंह यांच्यानुसार तेजस आणि 'JF-17 थंडर' यांची एकमेकांशी तुलना होणं अशक्य आहे. 'JF-17 थंडर' वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे. तेजस हे नेक्स्ट जनरेशनचं लढाऊ विमान आहे, जे इस्त्राईलच्या HMD विमानाप्रमाणे हाय टेक्नोलॉजीने बनवण्यात आलं आहे.
भारतीय बनावटीचं लढाऊ विमान 'तेजस' मागील आठवड्यात शिखर एअरबेसच्या बहरीन इंटरनॅशनल एअर शो 2016 मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झालं आहे.
पाकिस्तानसाठी 'JF-17 थंडर' पूर्वीचं लढाऊ विमान 'मिराज ।।।' आणि 'चेंगदू जम्मू 7' यांच्या रुपात विकसीत करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -