‘मिस वर्ल्ड’च्या टॉप-20 मध्ये भारताची प्रियदर्शनी
भारतात याआधी मिस वर्ल्डचा किताब आतापर्यंत प्रियंका चोप्रा (2000), रीता फारिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997) आणि युक्ता मुखी (1999) यांच्या नावावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयूएर्तो रिकोच्या स्टेफनी डेल वेलाने 2016 चा विश्वसुंदरीचा क्राऊन पटकावला आहे.
यूएर्तो रिकोच्या स्टेफनी डेल वेलाने 2016 चा विश्वसुंदरीचा क्राऊन पटकावला आहे. डोमिनिकन रिपब्लिक आणि इंडोनेशियाच्या सौंदर्यवतींना मागे टाकत स्टेफनी डेले वेनाला मिसवर्ल्ड 2016 चा मान मिळाला. भारताची प्रियदर्शनी ‘मिस वर्ल्ड 2016’च्या टॉप-20 मध्ये पोहोचली होती.
पाहा आणखी फोटो....
9 वर्षांची असताना प्रियदर्शनीला पोटात दुखत असल्याच्या कारणावरुन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी इंटेस्टाईनमध्ये ट्युमर मिळालं. सर्जरीनंतर प्रियदर्शनी पूर्णपणे बरी झाली.
बंगाली कुटुंबात जन्मलेली प्रियदर्शनी जास्तीत जास्त काळ आसाममधील गुवाहटी शहरात राहिली आहे.
प्रियदर्शनी सध्या समाजशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण घेत आहे.
उत्तर दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये प्रियदर्शनीने शिक्षण घेत आहे.
मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणारी प्रियदर्शनी ईशान्य भारतातील पहिली स्पर्धक आहे.
सध्या दिल्लीमध्ये राहणारी प्रियदर्शनी मूळची गुवाहाटीमधील आहे.
मिस परफेक्ट बॉडी, मिस रँपवॉक आणि मिस टॅलेंटचे किताबही प्रियदर्शनीच्या नावावर आहेत.
20 वर्षीय प्रियदर्शनी 2016 मध्ये फेमिना मिस इंडिया, फेमिन मिस इंडिया वर्ल्ड आणि फेमिना मिस इंडिया दिल्ली 2016 असे किताब पटकावले होते.
‘ब्युटी विथ अ परपज’मध्ये टॉप-5 मध्ये प्रियदर्शनी पोहोचली होती. मात्र, यामध्येही मिस इंडोनेशियाने बाजी मारली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -