PHOTO: भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय आणि बांग्लादेशची निर्मिती
भारताच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील वॉर मेमोरियल या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात 'स्वर्णिम विजय मशाल' पेटवून 1971 सालच्या युध्दातील भारताच्या विजय साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआत्मसमर्पण करा किंवा मरणाला तयार रहा असा संदेश सॅम मॉनेक शॉ यांनी 13 डिसेंबर रोजी पाकिस्तानला दिला.
भारताच्या वायू दल, नौदल आणि लष्कराने या युध्दात पराक्रम गाजवला आणि पाकिस्तानला गुडघ्यावर येण्यास भाग पाडले.
ढाका येथील पाकिस्तानच्या गव्हर्नरच्या घरावर बॉम्ब फेकणारे हेच ते भारतीय वायू दलाचे मिग21 विमान
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी कणखर भूमिका घेत लष्कर प्रमुख सॅम मॉनेक शॉ यांना पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्याचा आदेश दिला.
पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेशला मुक्त केल्याच्या घटनेला आणि भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजयाला ( India-Pakistan war) आज 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण झालीत. आजचा दिवस हा भारतात 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
भारतानं केवळ या युध्दात भागच घेतला नाही तर केवळ 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971.
या युध्दात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि जगाच्या नकाशावर बांग्लादेशला जन्म दिला.
तब्बल 93 हजार पाकिस्तानच्या सैनिकांचं भारतीय लष्करासमोर झालेलं आत्मसमर्पण हे दुसऱ्या महायुध्दानंतरचं सर्वात मोठं आत्मसमर्पण होतं.
हेच ते ऐतिहासिक आत्मसमर्पणाचं पत्र, जे भारताने पाकिस्तानसमोर ठेवलं होतं.
भारताच्या वतीनं मेजर जनरल जगजीत सिंह अरोरा आणि पाकिस्तानच्या वतीनं जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी आत्मसमर्पण पत्रावर सह्या केल्या. भारताचा हा ऐतिहासिक विजय होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -