'हाऊसफुल 3' ने शाहरुखच्या 'फॅन'चा विक्रम मोडला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा यंदाचा विकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
हाऊसफुल 3- 107 कोटी
'हाऊसफुल 3' ने पहिल्याच दिवशी 15.21 कोटी, दुसऱ्या दिवशी 16.30 कोटी तर तिसऱ्या दिवशी 21.80 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे कमाईचा आकडा 53.31 कोटींवर पोहोचला आहे.
'फॅन'पाठोपाठ अक्षय कुमारचा एयरलिफ्ट या सिनेमाने 44.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या बागी या सिनेमाने तीन दिवसात 38 कोटींची कमाई केली होती.
'हाऊसफुल 3'ने भारतात 53.31 तर जगभरात 26.77 मिळून 80.08 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 53 कोटींची कमाई केली आहे. तसंच 'हाऊसफुल 3' ने शाहरुखच्या 'फॅन' सिनेमाचा विक्रमही मोडला आहे.
यापूर्वी यंदा 'फॅन'ने विकेंडमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता 'हाऊसफुल 3'ने त्यापुढे मजल मारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -