प्रेमात पडताच मुलींमध्ये हे 5 बदल जाणवतात
प्रत्येक मुलगी स्वतःला सुंदरच मानते मात्र प्रेमात पडल्यानंतर यामध्ये जास्त बदल होतो. वारंवार आरशासमोर जाऊन मनात हसणं, चेहऱ्याची खास काळजी घेणं हे बदल मुलींमध्ये जाणवतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेमात पडल्यानंतर कोणी इमोशनल होतो, समजदार होतो किंवा एखादा नवीनच बदल जाणवू लागतो. मात्र मुलींच्या बाबतीत प्रेमात पडल्यानंतर काही बदल लगेच जाणवतात.
प्रेमात पडल्यानंतर मुलींची झोप कमी होते. रात्री फोनवर बोलणं, 'त्या'चा तासन् तास विचार करणं किंवा मेसेजवर बोलणं यामध्ये रात्र कधी जाते ते अनेकदा कळतच नाही.
प्रेमात पडल्यानंतर मुलींची पसंत ही बॉयफ्रेंडचीही पसंत बनते. बॉयफ्रेंडला भेटायचं असल्यास मुली कपड्यांच्या बाबतीत चांगल्याच सजग असतात. त्यामुळे बॉयफ्रेंडला आवडणारेच कपडे घालणं मुली पंसत करतात.
प्रेमात पडल्यानंतर मुलींचा मोबाईल हा टॉप सिक्रेट बनतो. अनेक मुली इतरांना मोबाईलला हात लावून देत नाहीत किंवा सारखं सारखं मोबाईलकडं पाहण्याची सवय लागते.
एकेकाळी प्रेमकथांवर विश्वास न ठेवणाऱ्या मुलींना प्रेमात पडल्यानंतर रोमँटीक आणि प्रेमाचे गाणे आवडतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -