गिरीप्रेमीची ऐतिहासिक कामगिरी, दहा गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर तिरंगा फडकावला!
ज्येष्ठ गिर्यारोहक माया शेर्पा आणि सिंगापूरचे खु स्वी चाऊ यांनीही उमेश झिरपे यांच्या मोहिमेदरम्यान शिखर चढाई केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय मोहिमेचे बेस कॅम्पवरुन नेतृत्व आणि संयोजन झिरपे यांनी केलं. गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखराची चढाई केली.
या आधी 2012 मध्ये माऊंट एव्हरेस्ट, 2013 मध्ये माऊंट ल्होत्से, 2014 मध्ये माऊंट मकालू, 2016 मध्ये माऊंट धौलागिरी आणि माऊंट च्यो ओयु आणि 2017 मध्ये माऊंट मनास्लुवर मोहीम फत्ते केली होती. अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक मोहीम नेते आहेत.
गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे.
माऊंट कांचनजुंगा शिखराची उंची 8586 मीटर आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट K2 नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. भारतातील सर्वात उंच शिखर माऊंट कांचनजुंगा हे भारत आणि नेपाळच्या सीमेवर आहे
कांचनजुंगा इको इक्स्पेडिशन 2019 ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम आहे. एकाच दिवशी 30 गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर एकाच दिवशी चढाई करणं हा नवा विक्रम आहे.
कांचनजुंगाची एकूण पाच शिखरं आहे. यात मुख्य शिखर (8586 मीटर), पश्चिम शिखर (8505 मीटर), मध्य शिखर (8482 मीटर), दक्षिण शिखर (8494 मीटर), कांगबाचेन शिखर (7903 मीटर) यांचा समावेश आहे.
गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला आहे. या मोहीमेदरम्यान गिरीप्रेमीच्या दहा गिर्यारोहकांसह 30 आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांनी माऊंट कांचनजुंगावर चढाई केली. आज (15 मे) सकाळी दहा वाजता गिर्यारोहकांनी शिखर सर केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -