गणेश विसर्जन: मुंबईत कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्ग कोणते?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (23 सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी पोलीस आणि मुंबई महापालिका सज्ज आहे. गिरगाव चौपटीवरील गणेश विसर्जन सोहळा जागतिक पातळीवर कसा नेता येईल यासाठी बीएमसी आणि महारष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
मुंबईत आज ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेशाचं विसर्जन केलं जात असताना वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतुकीचं नियमन केलं जावं यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आज संपूर्ण मुंबईतील 53 रस्ते बंद ठेवले असून 56 रस्ते एक दिशा मार्ग (वन लेन) केले आहेत. काही मार्गांना पर्यायी मार्गही करुन देण्यात आले आहेत. जेणेकरून वाहनचालकांना नियोजन करता येईल आणि वाहतूक कोंडी होणार नाही. त्यासोबतच आज जवळपास तीन हजार ट्रॅफिक पोलीस, स्वयंसेवक ट्रॅफिकचं नियमन करण्यासाठी संपूर्ण मुंबईभर तैनात असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -