ऐश्वर्याच्या 'पर्पल लिपस्टिक'वर सोनमची बेधडक उत्तरं!
सोशल मीडियावर उडविण्यात येणार खिल्लीला सोनमही उत्तर दिलं. 'मी स्वत:साठी तयार होते आणि मी सुंदर दिसते.'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेड कार्पेटवरील सोनमच्या या ड्रेसचीही सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडविण्यात आली होती.
जेव्हा सोनमला विचारण्यात आलं की, तू अशी लिपस्टिक लावशील का? त्यावर सोनम म्हणाली की, 'मी आधी पर्पल लिपस्टिक लावली आहे. एवढंच काय मी काळी लिपस्टिकही लावली होती.' पण तेव्हा लोक माझ्याबद्दल काही बोलले नव्हतं.
सोनम देखील कॉस्मेटिक ब्रॅण्डचा एक चेहरा आहे. तिच्या मते, ऐश्वर्याला हा रंग बराच आवडला आणि तिने आत्मविश्वासानं लावलाही.
'कान्समध्ये तिनं असं करणं फारच मजेदार आहे. ती प्रत्येक ठिकाणी ट्रेडिंगमध्येही होती.'
सोनम म्हणाली, तिला चर्चेत यायचं होतं आणि ते तिला मिळालं. मला वाटतं हे भारी आहे.
ऐश्वर्याच्या लिपिस्टिकबाबत सोनमला विचारलं असता ती म्हणाली की, 'जेवढी तिच्याबाबत चर्चा झाली त्यावर तिला खूश व्हायला हवं.'
सोशल मीडियावर तिची बरीच खिल्लीही उडविण्यात आली.
यावर्षी कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यानं एका सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान आपल्या ओठांवर पर्पल लिपस्टिक लावली होती. त्यामुळे तिची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती.
अभिनेत्री ऐश्वर्याचं म्हणणं आहे की, कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान तिनं पर्पल लिपस्टिक ही आपल्या कॉस्मेटिक ब्रॅण्डच्या सांगण्यानुसार लावली होती. पण सोनम कपूरचं म्हणणं आहे की, ऐश्वर्यानं तो रंग निवडला कारण की तिला चर्चेत यायचं होतं.
अभिनेत्री सोनम कपूर फॅशन आयकॉन मानली जाते. तर सौंदर्यांची उपमा ऐश्वर्याला दिली जाते. पण आता या दोघी एकमेकींसमोर आल्या आहेत. ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकवर सोनम असं काही म्हणाली आहे की, आजवर कोणीही बोललं नव्हतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -