कोण आहे फारुख टकला?
शस्त्रात्र उतरवणं, बॉम्ब तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मुंबईतील स्फोटाच्या काही दिवस आधी तो भारताबाहेर निघून गेला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, फारुख टकलाची अटक हे सीबीआयचं मोठं यश मानलं जात आहे.
आतापर्यंत टकलाने सुरक्षा यंत्रणांना बऱ्याचदा चकवा दिला होता. याआधी तो दुबई, यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता.
आजवर सीबीआयने त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अखेर सीबीआयच्या प्रयत्नांना आज यश आलं.
फारुख टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार होता. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची मुख्य भूमिका होती.
फारुख टकलाविरोधात 1995 साली रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. टकला यानं 93 साली मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतर भारताबाहेर पलायन केलं होतं.
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून आज (गुरुवार) सकाळी मुंबईत आणलं गेलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -