EXCLUSIVE PHOTO : नाशिक, पुण्यापर्यंत धावणारी विशेष लोकल मुंबईत दाखल
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2019 10:10 PM (IST)
1
सध्या मुंबईमध्ये असलेल्या या लोकलवर कारशेडमध्ये काही बदल आणि चाचण्या केल्या जातील.
2
आरडीएसओ आणि मध्य रेल्वेचे अधिकारी मिळून या लोकलची घाटात चाचणी घेतील.
3
अधिकची क्षमता, शक्ती आणि ब्रेकिंग पॉवर या लोकलमध्ये देण्यात आली आहे. बंबर्डीयर लोकलमध्ये जिथे 16 ब्रेक असतात, या लोकलमध्ये 32 ब्रेक असणार आहेत.
4
कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक या स्थानकांमधील घाटात धावण्यासाठी ही खास लोकल तयार करण्यात आली आहे.
5
चेन्नईच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीमध्ये ही लोकल बनवण्यात आली आहे.
6
मुंबईहून नाशिक आणि पुणे प्रवासासाठी विशेष लोकल ट्रेन तयार करण्यात आल्या आहेत. खासकरून घाटात धावण्यासाठी बनवलेली ही लोकल मुंबईत दाखल झाली आहे.