एक फोर, एक सिक्स, सोबत एक फ्लाईंग किस...!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. दुसऱ्या वाढिदिनी तिसरं द्विशतक ठोकण्याचा पराक्रम रोहितने गाजवला आहे.
त्यानं शिखर धवनच्या साथीनं ११५ धावांची, तर श्रेयस अय्यरच्या साथीनं ११३ धावांची भागीदारी रचली.
या सामन्यात रोहितनं कर्णधारास साजेशी खेळी उभारून, वन डे कारकीर्दीतलं सोळावं शतक साजरं केलं.
रोहितच्या याच खेळीच्या जोरावर टीम इंडियानं मोहालीच्या वन डेत श्रीलंकेला विजयासाठीभलंमोठं 393 धावांचं आव्हान दिलं आहे.
रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा 115 चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या 36 चेंडूत पूर्ण केल्या.
या क्षणी रितीकाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी तरळलं होतं.
रोहित शर्मा हा द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधार, तर वन डेत तीन द्विशतक ठोकणारा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.
त्यानंतर आता रोहितने श्रीलंकेविरुद्धचं मोहालीत त्याने नाबाद 208 धावा केल्या.
यापूर्वी रोहित शर्माने बंगळुरुत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 चेंडूत 209 (2/11/2013), मग कोलकात्यात (16/11/2014) श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या होत्या.
या एका धावेनंतर रितीकाच्या डोळ्यात साचून राहिलेले अश्रू एका दमात गळू लागले.
पुढच्याच चेंडूवर रोहितने एक धाव घेऊन द्विशतक पूर्ण केलं.
मात्र रोहितने धाव पूर्ण केली आणि द्विशतकाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला.
त्यावेळी रोहित शर्मा बाद होतोय की काय असं काही क्षण वाटत होतं.
रोहित 197 धावांवर होता, तेव्हा त्याने दुसऱ्या रनसाठी जीव तोडून धाव घेतली.
त्यावेळी रोहितची बायको रितीका सजदे अक्षरश: देवाचा धावा करत होती.
बहुतेक चौकार आणि षटकारानंतर रोहित शर्मा गॅलरीत बसलेल्या आपल्या बायकोकडे पाहून फ्लाईंग किस देत होता.
धर्मशाला वन डेत अब्रू गेलेल्या टीम इंडियाने मोहाली वन डेत फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली. टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने खणखणीत द्विशतक ठोकून, श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली.
महत्त्वाचं म्हणजे आजच्या सामन्याला रोहित शर्माची बायको रितीकाही उपस्थित होती.
रोहितने 151 चेंडूत द्विशतक झळकावलं. या सामन्यात रोहित शर्माने 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले.
रोहित शर्मा ज्यावेळी द्विशतकाजवळ पोहोचला होता, तेव्हा सर्वांचीच धाकधूक वाढली होती.
रोहितचं हे कारकिर्दीतील तिसरं द्विशतक ठरलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -