नऊ वर्षांनी कडा ओल्या झालेल्या नाथसागराची विहंगम दृश्यं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआभाळानं भरभरून दिलं, निसर्गानं किमया केली आणि धरणाचे दरवाजे 9 वर्षांनंतर ओले झाले. नाथाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पैठण नगरीत मुक्कामी असलेले हे आहे धरण जायकवाडी.
नाथसागर.... पाण्याचा लाटांचा आवाज. हे जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण रूप पाहिल्यावर या धरणाला ‘नाथसागर’ का म्हणतात हे लक्षात येतं. जायकवाडी धरणात हे पाणी ड्रोन कॅमेच्यारच्या नजरे पलीकडचे आहे. तब्बल 9 वर्षानंतर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे.
पाहा आणखी फोटो....
नाथांनी वाळवंटात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं होतं. या धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे 386 गावांची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील 2 लाख 77 हजार हेक्टर शेतीही याच पाण्यावर हिरवीगार होते. त्यामुळे भरलेलं हे धरण पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
पाण्यासाठी गोदामाईच्या लेकरांनी भांडणं केली. प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. कोर्टाच्या आदेशावरून दोन वेळा जायकवाडीत पाणी सोडण्यातही आलं. आज हे दृश्य पाहून डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील 5 औद्योगिक वसाहतीही याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने धारण शून्य टक्क्यावर गेले. त्यामुळे उद्योगचं पाणी 50 टक्के कमी केलं गेलं आता धरण भरले आहे.
शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गोदावरी नदीवर या धरणाचा जन्म झाला. 1976 ला इंदिरा गांधी यांनी लोकांची तहाण भागवण्यांची जिम्मेदारी सोपवली.
अफाट, अचाट, अतिभव्य, नयनरम्य या सर्व उपमा फिक्या पडत आहेत. कारण कित्येक वर्षांनंतर या धरणात पाणी मावेनासा झाला आहे.
102 टीएमसी पाणीसाठी इतकी अजस्त्र पाणी क्षमता, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहिली की मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी तरी सुटलाच समजा. 21 हजार 750 किलोमीटर स्क्वेअर पाणलोट क्षेत्र आहे. आज निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे याचा वापरही योग्य केला पाहिजे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -