तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचं निधन
करुणानिधी यांना 28 जुलै रोजी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरुणानिधींच्या निधनाने तामिळनाडू शोकसागरात बुडालं आहे. राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. तामिळनाडूतील सर्व दारु दुकाने आणि थिएटर्स बंद करण्यात आली आहेत.
एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी करुणानिधी यांचं अंतिम दर्शन घेतलं.
करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.
चित्रपटांपासून सुरु होऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेला करुणानिधी यांचा प्रवास अखेर थांबला आहे.
करुणानिधी यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.
करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह दिग्गज नेते चेन्नईत येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -