Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेन्नईच्या चाहत्यांना धोनीची खुशखबर!
शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नईच्या या विजयानंतर त्यांचं अजून सेलिब्रेशन बाकी आहे. धोनीचा सीएसके संघ घरच्या मैदानात केवळ एकच सामना खेळला. आयपीएलची ट्रॉफी उंचावल्यानंतर धोनीने चेन्नईच्या चाहत्यांना खुशखबर दिली.
वॉटसनने सुरेश रैनाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 57 चेंडूंत 117 धावांची भागीदारी उभारली. या भागीदारीने हैदराबादच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. चेन्नईने नऊ चेंडू राखून हैदराबादचं आव्हान पार केलं.
चेन्नईने यंदा तिसरं विजेतेपद पटकावून आयपीएलमधलं पुनरागमन मोठ्या रुबाबात साजरं केलं. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईवर गेली दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्याच नेतृत्त्वात मैदानात उतरत आपणच चॅम्पियन असल्याचं सिद्ध करुन दिलं.
चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.
धोनी म्हणाला, आम्ही घरच्या मैदानात केवळ एकच सामना खेळलो. आम्ही सोमवारी चेन्नईला जाऊन तिथे सेलिब्रेशन करु. आम्ही आमच्या चाहत्यांना भेटू. त्यानंतर संध्याकाळी जल्लोष साजरा करु. दोन वर्ष बंदी घातल्यानंतरही चेन्नईचे फॅन आपल्या संघाच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच त्यांच्यासमोर आम्ही विजयाचं सेलिब्रेशन करु, असे धोनीने संकेत दिले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -