ICC वन डे टूर्नामेंटमध्ये 1000 धावा पूर्ण, धवनने सचिनचा विक्रम मोडला

टीम इंडियाने शिखर धवन (78) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 76) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून मात केली. या विजयासोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय गोलंदजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 191 धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग भारतीय फलंदाजांनी 38 षटकांमध्येच म्हणजे 72 चेंडू राखून केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांचीही दाणादाण उडाली.

केवळ 16 सामन्यात धवनने हा विक्रम पूर्ण केला.
शिखर धवनने आयसीसी वन डे टूर्नामेंटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा विश्व विक्रम पूर्ण केला आहे.
धवनपूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आयसीसी टूर्नामेंटच्या 18 व्या सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
सलामीला आलेल्या शिखर धवनने 78 धावांची महत्वपूर्ण खेळी करुन एका विश्व विक्रमालाही गवसणी घातली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -