राजधानी दिल्लीत हिंसाचाराचे मन हेलावून टाकणारे फोटो व्हायरल
या आंदोलनामुळे वाहतूक पूर्ण ठप्प असून शाळांनाही सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. तरी, सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागरिकत्व दुरुस्ती काय़द्याच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दोन दिवसांपासून मोठा तणाव या भागात पाहायला मिळतोय. तर, जाफराबादेत आजही तणावपूर्ण शांतता आहे.
दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर भागात सीएए विरोधक आणि समर्थक यांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झालाय. तर 37 पोलिस गंभीर जखमी झालेत.
या हिंसाचारात अनेकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी सरकारी आणि खासगी मालमत्तेच नुकसान झालं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच आंदोलनाला हिंसक वळण लागलंय का?, असा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांचा तपास सुरु केला आहे.
या हिंसाचाराची तीव्रता पाहता सोमवारपासूनच दिल्लीतील अनेक भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर काही मेट्रो स्टेशनही बंद ठेवण्यात आलेत.
गृहमंत्री अमित शाहांनी तात्काळ बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांच्या कांड्याही फोडल्या. तर जमावाने एक पेट्रोल पंपही पेटवून टाकला.
आंदोलकांनी अनेक ठिकाणी खासगी वाहनांची जाळपोळ केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -