Datsun कंपनीची सर्वात स्वस्त कार भारतात लाँच, किंमत अडीच लाखापेक्षाही कमी
Redi Go ची तुलना भारतातील इतर स्वस्त कारसोबत केली जाणार आहे. त्यामुळे भारतात ही कार कशी चालते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. (सर्व फोटो सौजन्यः datsun.co.in)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRedi Go कारचं इंजिन देखील जबरदस्त क्षमतेचं आहे. यामध्ये 800 सीसी इंजिन देण्यात आलं आहे. यापूर्वी हे इंजिन रेनॉल्ट क्विडमध्ये वापरण्यात आलं होतं. या इंजिनची क्षमता 54 पीएस एवढी असून 72 एनएम चा टॉर्क आहे. ही कार 25.17 एवढे अॅव्हरेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
जपानी कंपनी Datsun ने आपली बहुप्रतिक्षीत स्वस्त कार भारतात लाँच केली आहे. या कारमध्ये कंपनीने पाच व्हेरिएंट लाँच केले असून पहिल्या व्हेरिएंटची किंमत केवळ 2 लाख 39 हजार रुपये आहे.
Redi Go कारमध्ये चार प्रवाशांसाठी जागा आहे. चार जण या कारमध्ये आरामदायी प्रवास करु शकतात. तर लगेज ठेवण्यासाठी देखील पर्याप्त जागा दिलेली आहे.
Redi Go असं या कारचं नाव आहे. ही कार आकाराने छोटी असून लूक हा जबरदस्त आहे. Redi Go च्या पहिल्या मॉडेलची किंमत 2 लाख 39 हजार रुपये आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 3 लाख 34 हजार रुपये आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -