अशी करा भ्रष्टाचाराची तक्रार
सामान्य व्यक्तीला शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. अनेकदा पैशांशिवाय कोणतंही काम होत नसल्याचा अनुभव येतो. मात्र तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अशा अधिकाऱ्यांची किंवा कोणत्याही भ्रष्ट व्यक्तिची तक्रार करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीव्हीसीला तुमची तक्रार योग्य वाटल्यास तक्रार नंबर दिला जातो. या तक्रार नंबरद्वारे सीव्हीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रारीची सद्यस्थिती पाहता येते.
सीव्हीसीला तुमची तक्रार पत्राद्वारे किंवा ऑनलाईन पाठवू शकता. सीव्हीसीच्या www.cvc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तक्रार करता येते.
सीव्हीसी अंतर्गत येणाऱ्या तक्रारींची चौकशी सीबीआय किंवा सीव्हीसीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते.
सीव्हीसी आयोग सीबीआय आणि ईडी व्यतिरीक्त दिल्लीतील सर्व स्पेशल सेलच्या निवड समित्यांचा अध्यक्ष असतो.
कोणावर भ्रष्टाचारचा आरोप असल्यास त्याचं सत्य समोर आणून कारवाईची शिफारस करणं आयोगाचं काम आहे.
केंद्र सरकारचा कोणताही अधिकारी, मंत्री यांच्यावर कसलाही आरोप झाल्यास त्याची चौकशी करणं, भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यावर नियंत्रण ठेवणं आणि अहवाल सरकारला देणं ही कामं सीव्हीसीकडून केली जातात.
सीव्हीसीच्या अखत्यारीत केंद्र सरकारचे सर्व मंत्रालय, कार्यालये, राष्ट्रीय बँका, रिझर्व्ह बँक, विमा कंपन्या आणि केंद्र शासित प्रदेश येतात.
भारतीय संसदेत 2003 साली केंद्रीय सतर्कता आयोग म्हणजेच सीव्हीसीची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या अंतर्गत भ्रष्टाचारावर आळा घालण्याचं काम केलं जातं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -