मी अमर होऊ शकतो...: उसेन बोल्ट
धावपटू उसेन बोल्ट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोल्टनं 100 मी. स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं असून आता त्याला 200 मी. आणि 4x100 मी. शर्यतीतील सुवर्णपदक खुणावत आहे.
बोल्ट मागील महिन्यातच ऑलिम्पिक ट्रायल स्पर्धेत जायबंदी झाला होता. ज्यानंतर त्याला उपचारही घ्यावे लागले होते.
'कोणीतरी म्हणत होतं की, मी अमर झालोय. पण मला आणखी दोन सुवर्णपदकं मिळवायची आहेत. त्यानंतर मी खरंच अमर होईन.' असंही बोल्ट म्हणाला.
100 मी. शर्यतीत सुवर्णपदक पटकावल्यावर बोल्ट म्हणाला की, 'मी फारच वेगात नाही धावू शकलो. पण मी या विजयानं खूष आहे.'
तीन ऑलिम्पिकमध्ये तीन-तीन सुवर्णपदकांची पटकवण्याची इच्छा आहे. म्हणजेच त्याला हॅटट्रिक साधायाची आहे. त्याने बीजिंग ऑलिम्पिक आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मी., 200 मी. आणि 4x100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे अशीच कामगिरी त्याला पुन्हा एकदा करायची आहे.
या पदकासोबतच बोल्टनं ऑलिम्पिकमध्ये सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिननं 9.89 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकावर नाव कोरलं तर कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासेला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
बोल्टनं ही शर्यत 9.81 सेकंदात पूर्ण केली, तर अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिननं 9.89 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकावर नाव कोरलं. उसेन बोल्टचं 100 मीटर शर्यतीतलं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं.
ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीतच सलग तिसरं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्टचं म्हणणं आहे की, तो अमर होण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -