टीव्हीवर पदार्पण केलेल्या 15 बॉलिवूड अभिनेत्री
एशा देवल : एमटीव्ही रोडीजमधून अभिनेत्री एशा देवलने टीव्ही डेब्यू केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमृता राव : अभिनेत्री अमृता रावने 'मेरी आवाजही पहचान है' या मालिकेत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.
मनिषा कोईराला : 2000 साली मनिषा कोईरालाने अनुपम खेर यांच्यासोबत झी टीव्हीवर सवाल दस करोड का या गेम शोचं सूत्रसंचालन केलं होतं.
जुही चावला : झलक दिखला जा च्या तिसऱ्या पर्वात जुही परीक्षक होती.
सोनाली बेंद्रे : क्या मस्ती क्या धूम या लहान मुलांच्या रिअॅलिटी शोमधून सोनाली छोट्या पडद्यावर आली. त्यानंतर इंडियन आयडल, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, इंडियाज गॉट टॅलेंट, हिंदुस्तानके हुनरबाज, च्या पर्वातही ती परीक्षकाच्या खुर्चीत होती. अजीब दासतां है ये या मालिकेतही ती झळकली होती.
करिष्मा कपूर : 2003 मध्ये करिश्मा- द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी या मालिकेत करिष्मा दुहेरी भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने नच बलिए आणि हस बलिए या कार्यक्रमांचं परीक्षणही केलं
रविना टंडन : 2004 मध्ये सहारा वन वाहिनीवर साहिब बिवी गुलाम या मालिकेत रविना मुख्य भूमिकेत होती. 2012 मध्ये इसी का नाम जिंदगी या कार्य़क्रमाचं निवेदन तिने केलं होतं. चक दे बच्चे, छोटे मिया, कॉमेडी का महामुकाबला यासारख्या काही रिअॅलिटी शोचंही तिने परीक्षण केलंय
माधुरी दीक्षित : 'कही ना की कोई है' या 2002 मध्ये सोनीवर आलेल्या शोमधून माधुरीने लग्न जुळवण्याचा विडा उचलला होता. त्यानंतर 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोच्या दोन पर्वात ती परीक्षकाच्या खुर्चीत दिसली. त्यानंतर तिने 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या शोचंही परीक्षण केलं.
प्रियंका चोप्रा : क्वॉन्टिकोसारख्या अमेरिकन सीरिजमध्ये दिसलेली प्रियंका भारतीय टीव्हीवरही झळकली होती. फिअर फॅक्टर : खतरोंके खिलाडीचा एक सिझन तिने होस्ट केला होता.
परिणीती चोप्रा : इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज या रिअॅलिटी शोमध्ये परिणीती मेन्टॉर अर्थात मार्गदर्शकाच्या भूमिकेत होती.
प्रिटी झिंटा : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड : अब तोडेगा इंडिया या शोचं सूत्रसंचालन प्रिटीने केलं. त्यानंतर अप क्लोज अँड पर्सनल विथ पीझेड आणि नच बलिए 7 या शोचं परीक्षणही ती करत होती.
मलायका अरोरा खान : मलायकाने आतापर्यंत अनेक टीव्ही शोचं परीक्षण केलं आहे. नच बलिएची पहिली दोन पर्व, जरा नचके दिखा, धूम मचा दे, परफेक्ट ब्राईड, झलक दिखला जा 4, नचले वे विथ सरोज खान आणि इंडियाज् गॉट टॅलेंटच्या काही पर्वात ती दिसली होती.
सोनाक्षी सिन्हा : इंडियन आयडल ज्युनिअर 2 चं परीक्षण करताना सोनाक्षी सिन्हा दिसली होती.
शिल्पा शेट्टी : बिग बॉसच्या एका पर्वाचं सूत्रसंचालन आणि नच बलिए 5 आणि 6 चं परीक्षण अशी जबाबदारी शिल्पाने सांभाळली होती.
काजोल : रॉक अँड रोल फॅमिली या फॅमिली डान्स रिअॅलिटी शोचं काजोल, अजय देवगन आणि तनुजा यांनी परीक्षण केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -