बर्थडे स्पेशल- बंदे मे था दम! मनमोहन सिंहांनी घेतलेले 5 निर्णय
5) शिक्षणाचा अधिकार: मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातच ‘राईट टू एज्युकेशन’ अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा अस्तित्त्वात आला. याअंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या. मनमोहन सिंहजींचा वाढदिवस म्हणजे त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि देशासाठी वाहून घेऊन केलेल्या कामाचं कौतुक करण्याची आमच्यासाठी एक संधी आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो अशा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, मनमोहन सिंह यांना दीर्घायुष्य लाभो अशी कामना केली.
4) भारत-अमेरिका न्यूक्लियर करार : यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर 2005 मध्ये भारत-अमेरिका अणूकरार करण्यात आला. प्रचंड दबावातही मनमोहन सिंह कोणासमोरही न झुकता, त्यांनी या कराराला प्रत्यक्षरुप दिलं. यामुळे न्यूक्लियर हत्यांरांबाबत एक शक्तिशाली देश म्हणून भारताची जगात ओळख झाली. त्यावेळी जॉर्ज बुश हे अमेरिकेचे अध्यक्ष होते.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज 86 वा वाढदिवस. मनमोहन सिंह हे आज 87 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या.
3) आधार कार्ड : सध्या मोदी सरकार सगळीकडे ज्या आधार कार्डचा उल्लेख करत आहे, ती देण मनमोहन सिंह सरकारची आहे. मनमोहन सिंहांच्या आधार योजनेचं कौतुक संयुक्त राष्ट्र अर्थात यूएन ने केलं होतं. आधार ही भारतातील सर्वोत्तम योजना असल्याचं यूएनने म्हटलं होतं.
2) रोजगार हमी योजना : बेरोजगारी हे भारतातील सर्वात मोठं संकट. मात्र मनमोहन सिंह यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेत मनरेगा म्हणून लागू केली. या अंतर्गत 100 दिवसांचा रोजगार आणि किमान 100 रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली. 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेचं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा असं नामकरण करण्यात आलं. या योजनेची आणखी एक खास बाब म्हणजे यामध्ये स्त्री-पुरुष सर्वांना समान वेतन आहे, कोणताही भेदभाव नाही.
मनमोहन सिंह यांचे मोठे निर्णय 1) जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण : मनमोहन सिंह यांना आर्थिक सुधारणांचे जनक म्हटलं जातं. 1991 मध्ये देशात नरसिंहराव यांचं सरकार होतं, त्यावेळी मनमोहन सिंह हे अर्थमंत्री होते. मनमोहन सिंह यांनी त्या वर्षीच जागतिकीकरणाचा निर्णय घेत, भारतासाठी जागतिक बाजारपेठ खुली केली.
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. मनमोहन सिंह हे 2004 ते 2014 या दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मनमोहन सिंह हे आपल्या मौनामुळे चर्चेत राहिले. मात्र अबोल राहून बोलकं काम करणं हीच त्यांची खासियत होती. अचाट बुद्धीमत्तेमुळे भारताच्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला कमी कालावधीत ट्रॅकवर आणणारा माणूस म्हणजे मनमोहन सिंह होय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -