Bigg Boss 13 : बिग बॉसच्या 13व्या पर्वाचा विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थने यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एन्टरटेन केलं. त्यामुळेच प्रेक्षकांनी त्याला या पर्वाचा विजेता केलं. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सिद्धार्थ आणि रश्मी या दोघांची भांडणंही दोघांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. पहिल्या दिवसापासूनच सर्वांच्या नजरा सिद्धार्थच्या गेम प्लानवर होत्या. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

घरामध्ये सिद्धार्थ आणि शहनाजची बॉन्डिंग सर्वांना प्रचंड आवडते. दोघांनीही सुरुवातीपासून ते ग्रँड फिनालेपर्यंत एकमेकांची साथ दिली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सिद्धार्थ आणि आसिमबाबत बोलायचे झाले तर त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकमेकांची साथ दिली, परंतु, त्यानंतर दोघांमध्ये फूट पडली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सीझनच्या सुरुवातीपासूनच सिद्धार्थने आपली ओळख एक स्ट्रॉन्ग प्लेयर म्हणून निर्माण केली होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सिद्धार्थ शुक्ला 'अॅन्ग्री यंग मॅन'चा टॅग घेऊन या घरात आला होता. चार महिन्यांच्या या प्रवासात सिद्धार्थने आपल्या टॅगचा कुठेही विसर पडू दिला नाही. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
दोन्ही कन्टेस्टेंट्स सिद्धार्थ आणि आसिम या पर्वातील विजयाचे प्रबल दावेदार होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
'बिग बॉस'च्या 13व्या पर्वाचं सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता सलमान खानने केलं असून त्यानेच या पर्वाच्या विजेत्याची घोषणा केली. तसेच सिद्धार्थला ट्रॉफीदेखील दिली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियॅलिटी शो 'बिग बॉस 13' च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. सिद्धार्थ शुक्लाने 13व्या सीझनची ट्राफी जिंकली असून आसिम रियाज फर्स्ट रनर अप ठरला आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -