भंडारदरा परिसरातील काजव्यांची मायावी दुनिया
हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा बसेरा असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती'असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण भान हरपून पाहातच राहतो.
शिखर स्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे,पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, तसंच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत.
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा- घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते.
झाडांच्या खोडांवर,फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर अनेक झाडांभोवती पिंगा घालत असतात.
विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो.
काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करत जीवनगाणे गात असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखावून जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -