Auto Expo 2020 : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत
यामध्ये 33kWh ची बॅटरी असून ती 46 bhp ची पावर देत आहे. ही कार फुल चार्ज केल्यानंतर 300 किलोमीटरच्या रेंजमघ्ये जाऊ शकते. एवढी रेंज सध्या भारतात असलेल्या ईव्हीमध्ये असून याचा टॉप स्पीड 102 किलोमीटर प्रतीतास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOra R1 हा WM ची मालकी असलेला एक ईव्ही ब्रँड आहे. किमतीच्या बाबतीत ही मारूती स्विफ्टच्या टॉप मॉडेलच्या जवळपास आहे. त्यामुळे या कारला जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असं म्हटलं जात आहे.
ही कार दिसायला अत्यंत क्युट आहे. सिम्पल ग्रिल असून तुम्ही तुमच्या आवडीचा कलर या गाडीला देऊ शकता. ही गाडी फार छोटी दिसते. परंतु, या गाडीचा आकार वॅगनआर आणि एस-प्रेसो यांसारखा आहे. याची बिल्ड क्वॉलिटी अत्यंत प्रिमियम आहे.
ऑटो एक्सपो 2020मध्ये अनेक नवनवीन कार लॉन्च करण्यात आल्या असून जगातील सर्वात स्वस्त ईव्ही कार ग्रेट वॉल मोटरने सादर केला आहे.
या कारमध्ये नॉर्मल चार्जिंगसोबतच फास्ट चार्जिंगची सुविधाही मिळते. ही 80 टक्के पर्यंत चार्च होऊ शकते. यामध्ये ब्रेक रिजन जसं फिचरही उपलब्ध आहे.
चीनमध्ये ही कार कोणत्याही डीलर्ससोबत एका अनोख्या पद्धतीने विकण्यात येतं. त्यामुळे ईव्ही कॉन्सेप्टप्रमाणे ही कारही वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येते. जर GWM ही कार भारतात लॉन्च करणार असेल तर ही इलेक्ट्रिक गाड्यांचा आदर्श ठरू शकते.
आतमधून प्रीमियम असण्यासोबतच सिंम्पल डिझाइनमध्ये आहे. यामध्ये 9 इंचाचा टचस्क्रिन, रियर कॅमेरा प्लस सेंसर आणि 4 स्पीकर लावण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -