Australia Bushfire : ऑस्ट्रेलियात सर्वात भीषण आग, 500 पेक्षा जास्त घरं जळून खाक

या आगीचा परिणाम म्हणून पूर्व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तर ऑस्ट्रेलियातील मान्सून मंदावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मागील वर्षात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात, ब्राझिलच्या अॅमेझॉनमध्ये, रशियाच्या सायबेरियात आणि इंडोनेशियालाही आगीचा मोठा फटका बसला आहे.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांची मदत घेतली जात आहे.
न्यू साऊथ वेल्समधल्या जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्राणी आणि पक्षांनी आपला जीव गमवला लागला आहे.
आगीमुळे ऑस्ट्रेलियाच्या तापमानातही मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं पाहायलं मिळतं आहे. यात मागील 125 वर्षातील उच्चांक न्यू साऊथ वेल्स या राज्याने तोडला आहे. सिडनीत 48 डिग्री सेल्सिअस एवढ्या उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेले वणवे हे जागतिक वातावरणीय बदलांचं प्रतिक आहे असं तेथील पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलं आहे. तसंच अजैविक इंधन जाळून होणारं प्रदूषण नियंत्रणात आणलं नाही तर ही परिस्थिती भविष्यात आणखी बिकट होईल असा इशाराही या पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांच्या अनेक भागांत पेटलेल्या भीषण वणव्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारत दौरा रद्द केलाय. सध्या न्यू साऊथ वेल्समध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्कॉट मॉरिसन यांचा भारत दौरा रद्द केला आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांच्या अनेक भागांत पेटलेल्या भीषण वणव्यामुळे न्यूझीलंड आणि ऑकलंड शहरात नारंगी रंगाच्या ढगांची चादर पसरली आहे.
या आगीमध्ये फ्लिंडर्स चेस नॅशनस पार्क, कांगारु बेट भागातील 14 हजार हेक्टर क्षेत्र भस्मसात झालं आहे. या वणव्यात आत्तपर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहे.
भीषण आगीच्या वणव्यात अख्खा दक्षिण ऑस्ट्रेलिया होरपळून निघत आहे. मात्र अवघा देश आगीच्या झळा सोसत आहे. कारण, न्यू साऊथ वेल्समधल्या जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे जवळपास 48 कोटी प्राणी आणि पक्षांनी आपला जीव गमवला असून न्यू साऊथ वेल्स राज्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -