बीडमध्ये रस्त्यांवर चित्र काढून 'लॉकडाऊन'बाबत जनजागृती, घरात राहण्याचं आवाहन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॉकडाऊन, संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे लोक रस्त्यावर येतच आहेत. त्यामुळे या कलाकारांनी हा प्रयत्न केला आहे.
पोलिसांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ‘वर्दीतला देव तुमच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे' असा संदेशही एका चित्रातून देण्यात आला आहे.
संदेश प्रभावी करण्यासाठी यमाच्या रुपात रेड्यावर बसू येणारा कोरोना विषाणू आदी कल्पक चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
या चित्रांच्या माध्यमातून ‘लॉकडाऊनचे नियम पाळा, यम टाळा’, कोरोना म्हणजे कोई रोड पर ना निकले, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या गर्भाशया एवढेच आपले घर सुरक्षित आहे त्यामुळे घरातच थांबा असे विविध संदेश देण्यात आले आहेत.
योगेश कडबाने आणि त्यांचे सहकारी राहुल भिसे, मनोज कोकणे, बालाजी चौरे व रंगनाथ गाडेकर यांनी आंबेजोगाई येथील चौकातील रस्त्यांवर प्रबोधनात्मक चित्रे काढण्यास सुरुवात केली. आतापर्यत या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि यशवंतराव चव्हाण चौकात एकूण सात चित्रे आणि संदेश रंगवले आहेत.
कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनविषयी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी बीडच्या अंबाजोगाई येथील चित्रकार योगेश कडबाने यांनी आपल्या कलेची मदत घेतली आहे.