दोन गावं, एक देव.... ड्रोनच्या नजरेतून पहिल्यांदाच जत्रेचा फेरफटका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावणे दोन महिन्यानंतंर येणार्या जत्रेच्या आधी.. .या मल्लांची दंगल रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.
काल अणदूरच्या मंदिरातून मूर्ती नळदुर्गला रवाना झाली...मूर्ती परत येईल तेंव्हा मोठी जत्रा साजरी होईल.
या मंदिरात गाईची हत्या केल्यामुळं देव अणदूरमध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे. अणदूरचे मंदिर उत्तराभिमुख आणि तटबंदीनं युक्त आहे. तटाची उंची ३५ फुट पूर्व पश्चिम लांबी१९० आणि दक्षिण उत्तर लांबी १०५ फुट आहे.
रात्री छबिना म्हणजेच पालखी निघते. पालखीच्या वेळी आसपासच्या गावांना काठ्यांचा मान असतो. छबिन्यासमोर भंडारा, खोबरेंयांची मुक्त उधळण होते.
अणदूरच्या खंडोबा मंदिराच्या देखभालीसाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हजारो एकर जमीन दान दिली.
दोन गावच्या ग्रामस्थांत लेखी करार होतो. साध्या चिठ्ठीवर करार करून अणदूरकर नळदुर्गांना मुर्ती देतात. पावणे दोन महिन्यानंतर मूर्ती परत अणदूरला देण्याचं वचन दिलं जातं.
दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. पण मूर्ती एकच. अणदूरला खंडोबा वर्षातीले १० महिने २५ दिवस आणि नळदुर्गला पावणे दोन महिने वास्तव्य करतात असं मानतात.
इस १०४२ च्या दरम्यान हा रणमंडल नावाचा किल्ला बांधला. तोचं पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्या जवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आलं.
अणदूरात खंडोबाच्या साक्षीनं कुस्तीचा फड रंगलाय. प्रत्येक कोपऱ्यापर्यंत कुस्ती..अन् मल्लांचे वेगवेगळे डाव.
नळदुर्ग आणि अणदूर ही दोन ऐतिहासिक वारसा सांगणारी गावं.. अणदूरचे मुळनाव आनंदपूर.. नळदुर्गलाही प्राचीन इतिहास आहे..
सुगीचे दिवस संपलेत..सगळीकडे जत्रांची रेलचेल पाहायला मिळतीये...हलगीचा नाद, कुस्त्यांचे फड, मिठायांची दुकानं नजर जाईल तोपर्यंत चित्र....मुंबई-हैदराबाद महामार्गावरच्या नळदूर्ग आणि अणदूर या गावातील जत्रांची मात्र बातच न्यारी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -