जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अजिंठा, वेरुळच्या लेण्यांना भेट
एक जूनपासून बेजोस यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बिल गेट्स यांची एकूण 92.9 अब्ज डॉलर इतकी आहे. तर वॉरन बफेट यांच्या संपत्तीचं मूल्य 82.2 अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत बेजोस यांची अमेझॉन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या उत्पन्नाच्या बाबतीत केवळ अॅपल कंपनी अमेझॉनच्या पुढे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी जेफ बेजोस यांची ओळख आहे. बेजोस यांची एकूण संपत्ती 141.9 अब्ज डॉलर इतकी आहे. ‘फोर्ब्स’ने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं.
अजिंठा, वेरुळच्या लेण्या पाहिल्यानंतर जेफ बेजोस वाराणसीला जाणार आहेत. औरंगाबाद विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं.
औरंगाबाद : अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळच्या लेण्यांना त्यांनी पत्नी आणि मुलांसह भेट दिली.